छापील वजनापेक्षा कमी बिस्किटे आढळल्याप्रकरणी कंपनीवर गुन्हा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

छापील वजनापेक्षा कमी बिस्किटे आढळल्याप्रकरणी कंपनीवर गुन्हा

Share This
मुंबई, दि. 22 : माँजिनिज श्रुसबेरी कुकीज बिस्किटाच्या पाकिटामध्ये छापील वजनापेक्षा कमी बिस्किटे आढळल्याप्रकरणी वैधमापन शास्त्र यंत्रणेने अंधेरीतील मे. माँजिनिज फूड प्रॉडक्ट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी कळविली आहे.
पॅकबंद वस्तूच्या छापील किमती व वजनामध्ये ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यांच्या निर्देशनानुसार व यासंबंधी आलेल्या माहितीच्या आधारे तक्रारीच्या वैध मापन यंत्रणेने अंधेरीतील माँजिनिज फूड प्रॉडक्ट कंपनीने उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांच्या निव्वळ वजनांची तपासणी केली. त्यापैकी माँजिनिज श्रुसबेरी कुकीज बिस्किटच्या पाकिटावरील छापील वजनापेक्षा कमी वजनाची बिस्किटे असल्याचे आढळून आले. त्यामुळे वैधमापन शास्त्र यंत्रणेने नियमांच्या उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आवेष्टित (पॅकबंद) वस्तूंच्या छापील किमतीपेक्षा जास्त दराने करण्याच्या विक्री अथवा कमी वजन देण्याच्या घटना आढळून आल्यास त्याविरुद्ध वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्ष क्रमांक 022-22886666 किंवा ई मेल – dclmms_comlaints@yahoo.com तसेच यंत्रणेच्या फेसबुक पेज (Legal Metrology Maharashtra Consumer grievances) या ठिकाणी तक्रार करण्याचे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages