मुंबईच्या चौपाट्या उजळणार हायमास्ट दिव्यांनी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2016

मुंबईच्या चौपाट्या उजळणार हायमास्ट दिव्यांनी

मुंबई - मुंबईच्या चौपाट्यांवरील प्रकाशव्यवस्था सक्षम करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पाऊल उचलले आहे. हायमास्टच्या दिव्यांच्या माध्यमातून चौपाटीच्या जागेवर अधिक प्रकाश पोहचावा हा यामागचा उद्देश आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून हायमास्टच्या दिव्यांच्या प्रायोगिक प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या यशावर इतर चौपाटींच्या ठिकाणी आगामी वर्षभरात प्रकाश व्यवस्था सुधारण्यात येणार आहे. 
मुंबईतल्या चौपाट्यांवर वर्षानुवर्षे बेस्टची प्रकाशव्यवस्थेची जबाबदारी आहे. त्या ठिकाणी आता असणारे मनोरे हे सरासरी पंचवीस वर्षे जुने आहेत. त्यामुळेच हायमास्ट दिव्यांच्या माध्यमातून ही प्रकाशव्यवस्था बदलण्याचा बेस्टचा मानस आहे. गिरगाव चौपाटीवर प्रायोगिक प्रकल्पान्वये नऊ मनोऱ्यांवर हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे उपमहाव्यवस्थापक एम. बी. उरणकर यांनी दिली. मुंबईतील चौपाट्यांच्या ठिकाणी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांची असणारी वर्दळ पाहता नवनवीन तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा बेस्टचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणजे गिरगाव चौपाटीचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या यशावर इतर चौपाट्या तसचे गणेशविसर्जनाच्या मोठ्या ठिकाणांवरही हायमास्टचे तंत्रज्ञान अमलात येईल. हायमास्टच्या दिव्यांसाठी एलईडीचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याने दिव्यांच्या वीज वापरामध्ये 40 टक्के विजेची बचत शक्‍य असल्याचे ते म्हणाले. बेस्टच्या क्षेत्रासाठीच हा प्रयोग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने आगामी वर्षभरात या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल. त्यानंतरच इतर ठिकाणी या तंत्रज्ञानाची दिशा ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad