'वायसीएमओयू'कडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची लूट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'वायसीएमओयू'कडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची लूट

Share This
मुंबई - अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये आणि तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, अशी नियमांत तरतूद असतानाही यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठाकडून (वायसीएमओयू) मागासर्गीय विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
अनुसूचित जातीसाठी भारत सरकारची मॅट्रिकेतर शिष्यवृत्ती योजना व शुल्क देण्याची योजना आहे. शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान करणे या योजनेखाली 90 टक्‍के या अनुदानातून विद्यार्थ्यांच्या फीची प्रतिपूर्ती करावी, असे म्हटले आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये आणि तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येणार आहे. तरीही, विद्यापीठाच्या प्रशासनाने शैक्षणिक शुल्क आकारण्याचे ठरवले असल्याने राज्यभरातील सुमारे पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची लूट सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, तसेच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना निवेदन दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages