अभिमत विद्यापीठाचे वैद्यकीय प्रवेशाचे अधिकार संपुष्टात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2016

अभिमत विद्यापीठाचे वैद्यकीय प्रवेशाचे अधिकार संपुष्टात

मुंबई - अभिमत विद्यापीठास वैद्यकीय प्रवेश देण्याचे अधिकार नसून त्यांनी सध्याच्या रिक्त जागा व दिनांक 16 सप्टेंबर 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशापूर्वी प्रवेशित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार यादी शासनास सादर करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार रिक्त सर्व जागा केंद्रीयकृत पध्दतीने भरण्यात येतील. प्रवेश प्रक्रियेची मुदत 7 ऑक्टोबर 2016 पर्यंत वाढवून दिल्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.

अभिमत विद्यापीठामधील प्रवेश केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेतून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यास उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्थगिती दिली होती. वैद्यकीय प्रवेशासंदर्भात शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या दिनांक 16 सप्टेंबर 2016 रोजी दिलेल्या स्थगिती आदेशाच्या अगोदर अभिमत विद्यापीठांनी केलेले सर्व प्रवेश वैध ठरवले आहेत. तद्नंतर रिक्त राहणाऱ्या सर्व जागा गुणवत्तेच्या आधारे केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेतून भरण्यात येणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांनी शासनाच्या वतीने काम पाहिले.

Post Bottom Ad