अवैध दारु व्यवसायाची तक्रार व्हॉटस ॲपवरुन देता येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अवैध दारु व्यवसायाची तक्रार व्हॉटस ॲपवरुन देता येणार

Share This
मुंबई, दि. 16 : राज्यात अवैध दारु व्यवसाय तसेच अवैध दारु वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तशी तक्रार आता व्हॉटस ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. 8422001133 या क्रमांकावर व्हाटस ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येणार असून, तक्रारकर्त्याचे नाव व माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा यांनी कळविले आहे.
शहरात समाजकंटकांकडून अवैध दारु व्यवसाय होत असल्याचे माहिती असूनही पोलिस विभागाकडे तक्रार करण्यास नागरिक धजावत नाहीत. त्यांना निर्भीडपणे तक्रार करता यावी यासाठी व्हाटस ॲपवर तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या तक्रारीची दखल आयुक्त तसेच वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या व्हॉटस ॲप क्रमांकावर जास्तीत जास्त तक्रारी नोंदवाव्यात. जेणेकरुन राज्यात अवैध दारु धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages