पालिका पशुवैद्यकीय विभाग सुरु करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2016

पालिका पशुवैद्यकीय विभाग सुरु करणार

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेने पशुवैद्यकीय विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विभाग पुढील वर्षापासून सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली.
मुंबईमधे कुत्र्यांची नसबंदी गेले कित्तेक वर्षे सुरु आहे. परंतू कुत्र्यांची संख्या मात्र वाढत आहे. पालिका मात्र नसबंदी करणाऱ्या संस्थाना निधी देत असते. कुत्र्यांची नसबंदी खरोखरच होते का ? नसबंदी योग्यप्रकारे केली जाते का ? मुंबईमधे लेप्टोस्पायरेसीस सारखे रोग प्राण्यांमुळे पसरत आहेत. असे असताना यावर उपाय करण्यासाठी पालिकेकडे मात्र जनावरांचे डॉक्टर नाहित. जे जनावरांचे डॉक्टर आहेत ते फ़क्त देवनारच्या पशुवधगृहामधे कार्यरत आहेत. यामुळे पालिकेने पशुवैद्यकीय विभाग सुरु करून जनावरांचे डॉक्टर नियुक्त करावेत अशी मागणी आरोग्य समितीमधे नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केली होती. याला आरोग्य समितीने मंजूरी दिल्याने पालिकेत पुढील वर्षी पशुवैद्यकीय विभाग सुरु केला जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS