पालिकेत बायो मेडिकल इंजीनियरिंग विभाग सुरु होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2016

पालिकेत बायो मेडिकल इंजीनियरिंग विभाग सुरु होणार

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील मशीन बंद पडल्यामुळे रुग्णाना त्रास सहन करावा लागतो. रुग्णाना होणारा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने बायो मेडिकल इंजीनियरिंग विभाग सुरु करावा अशी मागणी नगरसेविका सईदा खान यांनी केली होती. पालिकेच्या आरोग्य समितीने ही मागणी मान्य केली असून पुढील आर्थिक वर्षात हा विभाग सुरु केला जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात सातत्याने मशीन बंद पडल्याने अनेक चाचण्या बाहेरून कराव्या लागत असतात. पालिकेने रुग्णालयासाठी मशीनी खरेदी केल्या असल्या तरी या मशीनीची देखभाल आणि दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल होत असतात. पालिका रुग्णालयातील रुग्णांचे हाल कमी करता यावे व त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नए म्हणून बायो मेडिकल इंजीनियरिंग विभाग सुरु केला जाणार आहे.

या विभागात रुग्णालयात लागणाऱ्या मशीनची दुरुस्ती करणाऱ्या अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे अभियंते बंद पडलेली मशीन वेळेवर सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पालिका रुग्णालयातील सर्वच मशीनला बारकोड लावला जाणार आहे. या बारकोड द्वारे कोणत्या मशीन बंद पडल्या आहेत कोणत्या चालु आहेत याची माहितीही प्रशासनाला मिळणार आहे अशी माहिती सईदा खान यांनी दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS