मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2016

मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मोर्चा

मुंबई : अनुसूचित जातीमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्याची मागणी करत अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडी या संघटनांनी सोमवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला. यावेळी मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा मातंग समाजाच्या नेत्या कुसुम गोपले यांनी केला आहे.

नुकतेच मातंग समाजाचे नेते क्रांतीवीर बाबासाहेब गोपले यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या निधनानंतर खचून न जाता समाजाने धडक मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र आरक्षणाची आठवण करून दिली. मोर्चा दरम्यान शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून मातंग समाजाच्या स्वतंत्र ८ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय शेवटच्या श्वासापर्यंत मातंग समाजासाठी लढणाऱ्या बाबासाहेब गोपले यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईत उभारण्याचे मान्य केले.

शासनाने अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण द्यावी, अशी मातंग समाजाची मागणी आहे. या मागणीसोबत भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे दोन हजार कोटी भाग भांडवल वाढवावे, या मागण्यांवरही मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कुसुम गोपले यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS