बाळासाहेब स्मारक ट्रस्टवर उद्धव,आदित्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाळासाहेब स्मारक ट्रस्टवर उद्धव,आदित्य

Share This
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रस्तावित ट्रस्टसाठी शिवसेनेने चार नावांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविली आहे. यात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ सेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि वास्तुविशारद शशी प्रभू यांचा समावेश करण्यात आला आहे.


या स्मारकाच्या प्रस्तावित ट्रस्टमध्ये ११ जणांचा समावेश असणार आहे. उद्धव ठाकरे या ट्रस्टचे आजीव सदस्य व अध्यक्ष असतील. आदित्य ठाकरे यांच्याकडेही आजीव सदस्यत्व असणार आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री या ट्रस्टवर असतील. शिवसेनेकडून ट्रस्टवरील सदस्यांची नावे पाठविण्यात आल्यानंतर लवकरच धर्मादाय आयुक्तांकडे ट्रस्टची नोंदणी करण्याचे काम सरकारकडून हाती घेण्यात येईल. ट्रस्टच्या नोंदणीनंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे. ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या महापौर बंगल्यासह शेजारील क्लबची जागाही स्मारकासाठी घेण्यात येणार आहे. क्लबच्या जागेवर बाळासाहेबांशी संबंधित शिल्प ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. महापालिकेने यापूर्वीच क्लबला जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages