सीएसटी स्थानक, परिसराच्या सुशोभिकरणासाठी रेल्वे आणि महापालिकेचा आराखडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सीएसटी स्थानक, परिसराच्या सुशोभिकरणासाठी रेल्वे आणि महापालिकेचा आराखडा

Share This
मुंबई : सीएसटी स्थानक आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेने आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील १0 ठिकाणांची निवड केली असून त्यामध्ये सीएसटीचा समावेश आहे. त्याअनुषंगाने मरे आणि पालिकेने संयुक्तपणे आराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्वच्या सर्व १0 ठिकाणांचे व्यवस्थापन करणार्‍या समितीतर्फे नवी दिल्लीमध्ये येत्या ३0 सप्टेंबर रोजी सादरीकरण करण्यात येणार आहे.
सीएसटीच्या सुशोभिकरणासाठी करण्यात येणार्‍या सादरीकरणात वर्षभराचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यात सुशोभिकरणासाठी सीएसटीच्या ५0, १00 आणि ५00 मीटर अंतरातील जागांचा समावेश करण्यात आला आहे. त्या प्रत्येक टप्प्यासाठी अनुक्रमे ३, ६ आणि १ वर्षाच्या कालावधीत बदल करण्यात येणार आहे. मरेने त्यासाठी जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तर पालिकेने कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँण्ड कल्चरल हेरिटेज (आयएनटीएसीएच)ची निवड केली आहे. याबाबत सोमवारी प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. पालिकेकडून सीएसटी स्थानकाजवळ पादचारी मार्गाप्रमाणेच स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. त्यात फेरीवाल्यांना अन्यत्र हलवणे, लोखंडी कठडे उभारण्यासारख्या गोष्टींचा समावशे आहे. त्यासह युनेस्कोने दिलेल्या सूचनांचे पालन करत जाहिरातीचे फलक आणि पोस्टर्सही हटवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या परिसरातील स्वच्छता यापुढे रात्री १0 वाजेपर्यंतच न करता संपूर्ण दिवसभर करण्यात येणार आहे. मरेनेही स्वच्छतेवर भर देतानाच अनधिकृत फेरीवाल्यांपासून विविध मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये स्टेशनलगतचा बेस्ट आगार जवळच स्थलांतरित करण्यासारख्या पर्यायांवर बेस्ट प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल, अशी भूमिका रेल्वेतर्फे मांडण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages