एका धर्माने दुसऱ्या धर्माचा आदर करावा - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एका धर्माने दुसऱ्या धर्माचा आदर करावा - रामदास आठवले

Share This
आरपीआयला ३० जागा मिळाल्या तर भाजपासोबत 
लखनौ - देशात 8 धर्म, 6 हजार 400 जाती आणि 18 भाषा आहेत तरी देश एक आहे. त्याचे सर्व श्रेय भारतीय संविधानालाच जाते.संविधानाने सर्वधर्म समभावाचे मूल्य समाजमनावर बिंबवले आहे. एका धर्माने दुसऱ्या धर्माचा आदर करावा एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर केल्यानेच देश आणि समाज एकसंघपणे चालतो असे प्रतिपादन केंद्रिय समाजीक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
लखनौ येथे आज (11 Sep 2016) सर्वधर्म समभाव संमेलनाचे उद्घाटन कार्यक्रम सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून आठवलें सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. या संमेलनाचे आयोजन विश्व सर्वधर्म संसद या संस्थेने केले होते. सर्व धर्म संमेलनास जगभरातील21 देशांतून सर्व धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धर्म वेगळे असले तरी देश एक आहे. माणूस एक आहे. भारतीय म्हणून आपण एक आहोत. एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करून सहिष्णुतीने बंधुतेने भारतीय म्हणून सर्वानी एकत्र राहीले पाहिजे अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.

आरपीआयला ३० जागा मिळाल्या तर भाजपासोबत उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सज्ज झाले आहेत. भाजपासोबत या निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त करतानाच आठवले यांनी हे स्पष्ट केले की, जर आरपीआयला या राज्यात ३० जागा मिळाल्या, तर भाजपासोबत आम्ही निवडणूक लढवू. भाजपाच्या नेतृत्वाबरोबर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

लखनौत पत्रकारांशी बोलताना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यात बसपाला आरपीआयचा पर्याय उभा करण्याचा दावा केला. आगामी निवडणुकीत भाजपा आणि आरपीआय राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करतील, असे सांगून आठवले म्हणाले की, बसपा केवळ दलितांच्या मतांचा सौदा करीत आहे, तर दलित, अल्पसंख्यांक आणि सवर्णातील आर्थिकदृष्ट्या मागास यांच्यासाठी संघर्ष करणे, हे आरपीआयचे ध्येय आहे.

आठवले म्हणाले की, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती हटवून कांशीराम यांच्या मूर्ती स्थापन करण्याचे जे काम केले आहे ते बाबासाहेबांचा अवमान करणारे आहे, तर महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आम्ही मोठे आंदोलन केले होते. यात आरपीआयच्या नऊ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत राज्यात अधिकाधिक निधी देण्यात येईल, तर डोक्यावरून मैला नेण्याची प्रथा बंद केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages