मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची उद्या मुंबईतील १२ वी पदयात्रा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची उद्या मुंबईतील १२ वी पदयात्रा

Share This
मुंबई / प्रतिनिधी - शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची मुंबईतील १२ वी पदयात्रा घाटकोपर पूर्व, रमाबाई कॉलनी आंबेडकर चौक ते कामराज नगर, नेताजी नगर आंबेडकर स्मारक पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे.
इतर राजकीय पक्ष धोरणात्मक निर्णयावर व घोषणांवर अवलंबून असताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मात्र रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील विविध विभागात पदयात्रा घेऊन ते जनतेसमोर येत आहेत. सर्व सामान्य जनतेत मिसळत आहेत. त्यांना या पदयात्रेला सामान्य लोकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ही नवचैतन्य निर्माण झालेले आहे. सामान्य जनता आणि कार्यकर्ते स्वतःहून उत्साहाने या पदयात्रेत सहभागी होत आहेत. या पदयात्रे दरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम ३ ते ४ चौक सभा घेऊन शिवसेना भाजपा सरकारचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. मुंबई महानगरपालिकेतील घोटाळे व भ्रष्टाचाराची माहिती ते जनतेला देत आहेत.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या आधी अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, कुलाबा, जुहू, सायन, धारावी – माटुंगा, वडाळा, जोगेश्वरी पश्चिम, मालाड पूर्व, कांदिवली पूर्व, कांदिवली पश्चिम चारकोप, खेरवाडी – गोळीबार आणि शिवाजी नगर गोवंडी अशा ठिकाणी पदयात्रा काढलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages