अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यू - शाहिद कपूरच्या घरात डेंग्यूच्या अळ्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यू - शाहिद कपूरच्या घरात डेंग्यूच्या अळ्या

Share This
मुंबई,दि.16- प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 2012 मध्ये डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. यानंतर उच्चभ्रू वस्तीमधून डेंग्यू पसरत असल्याचे समोर आले होते.  आता ‘कहानी 2’ या आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करुन नुकतंच अमेरिकेहून परतलेली अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे पुन्हा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये डेंग्यू पसरत असल्याचे उघड झाले आहे. विद्या बालन हिला 10 दिवस पूर्ण आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी विद्याला दिला आहे. सध्या विद्या बालनचे ''कहानी 2' आणि 'बेगम जान' हे दोन चित्रपट येऊ घातले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी तिला पुढील १० ते १५ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. विद्या बालन ही जुहूतारा रोडवरील प्रणिती इमारतीत राहते. तिच्या घराची तपासणी केली तेव्हा अधिकाऱ्यांना तिथे डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या नाहीत.

पण, विद्या बालनच्या घराच्या वरती चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या मीरा पटेल यांच्या घरात दोन ठिकाणी डेंग्यूच्या डासांच्या अळ््या आढळल्या. तर, याच इमारतीत शाहीद कपूरचे घर आहे. त्याच्या खासगी तरणतलावात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ््या आढळल्या आहेत. त्यानंतर तत्काळ या अळ््या मारण्यात आल्या. या दोन्ही घरांवर महापालिकेच्या अधिनियम ३८१ बी नुसार कारवाई करण्यात आली आहे. यांना नोटीस पाठवण्यात आली असून यांना २ ते १० हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

जुहूतारा रोडवरील या इमारतीच्या तपासणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना आधी इमारतीत येण्यास मज्जाव करण्यात आला. महापालिकेकडून आल्याचे सांगूनही त्यांना इमारतीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने इमारतीत प्रवेश मिळवला आणि तपासणी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages