एट्रोसिटी कायदा रद्द करू नये - खासदार नरेंद्र जाधव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एट्रोसिटी कायदा रद्द करू नये - खासदार नरेंद्र जाधव

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
सध्या एट्रोसिटी कायद्यात बदल करावा म्हणून मोर्चे काढले जात आहे असे भासवाले जात आहे. एट्रोसिटी कायद्याचा कुठे गैरवापर होत असल्यास त्यात संसदेने बदल करावा परंतू हा कायदा दलितांचे संरक्षण कवच असल्याने रद्द करू नये. एट्रोसिटी कायद्याची उत्तम अंमलबजावणी करायला हवी असे मत राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाद्वारे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात जाधव बोलत होते.
सध्या राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. हे मुकमोर्चे असले तरी एट्रोसिटी कायदा रद्द करण्यासाठी असल्याचे भासवले जात आहे. यामधून दलित मराठा समाजात संघर्षाची बीजे रोवली जात असून दोन समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे जाधव यांनी सांगितले. दादर येथील चळवळीचे केंद्र असलेले आंबेडकर भवन पाडून त्यामधील बुद्धभूषण प्रेस पाडणे हा अक्षम्य अपराध आहे याला क्षमा नाही असे जाधव म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त देशभरात 125 व्याख्याने देणार असून ही व्याख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, पंजाब तसेच निवडणूका होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशात ही व्याख्याने होतील. व्याख्यानांचे व्यासपीठ सामाजिक असून यामधे कुठेही राजकीय ब्यानर वापरला जाणार नाही. व्याख्यानाची सुरवात बाबासाहेब आंबेडकर ज्या महाविद्यालयात शिकवत होते त्या सिडनह्याम महाविद्यालयापासून करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages