दिवा स्थानकातही थांबणार फास्ट लोकल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2016

दिवा स्थानकातही थांबणार फास्ट लोकल

मुंबई - गर्दीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणा-या 'दिवा' स्टेशनवरही आता फास्ट लोकल थांबणार असल्याने दिव्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून ही अमलबजावणी होणार असून दररोज १० फास्ट लोकल दिवा स्टेशनवर थांबतील. दिवा स्टेशनवर बांधण्यात येणा-या दोन नवी प्लॅटफॉर्म्सचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर कल्याण ते सीएसटी स्थानकादरम्यान धावणा-या काही फास्ट लोकलना दिवा स्टेशनवरही थांबा देण्यात येणार आहे. रोजच्या ८४ फास्ट लोकल्सपैकी निवडक १० लोकल दिव्यात थांबतील.

Post Bottom Ad