मध्य व पश्चिम रेल्वेच्या ११ स्थानकांवर नुकतीच वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याला भरघोस प्रतिसाद मिळत असून, ११ स्थानकांवर प्रत्येक आठवड्याला पाच लाख प्रवाशांकडून वाय-फायचा वापर केला जात आहे. मिळणारा प्रतिसाद पाहता, आणखी काही स्थानकांवर लवकरच वाय-फाय उपलब्ध केले जाईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. २0१८ पर्यंत देशभरातील एकूण ४00 स्थानकांवर वाय-फाय सेवा देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला २०१६ पर्यंत १00 स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वाय - फाय देण्यात येणार आहे.
Post Top Ad
14 September 2016
Home
Unlabelled
आठवड्याला पाच लाख रेल्वे प्रवाशांकडून वाय-फायचा वापर
आठवड्याला पाच लाख रेल्वे प्रवाशांकडून वाय-फायचा वापर
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

