सैराटकार नागराज मंजुळेंविरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे घाटकोपर मध्ये आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 September 2016

सैराटकार नागराज मंजुळेंविरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे घाटकोपर मध्ये आंदोलन

मुंबई दि 21 -- केंद्रिय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्याबद्दल अनुद्गार काढणारे सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याविरुद्ध सर्वोदय सिग्नल घाटकोपर पश्चिम येथे आज तीव्र आंदोलन करण्यात आले .

रामदास आठवले यांच्याबद्दल आठवले हे गम्मतीचा विषय असल्याचे अनुद्गार नागराज मंजुळे यांनी काढले होते. त्याचा तीव्र निषेध करून आठवले हे गम्मतीचा नसून हिम्मतीचा विषय आहे. ते दलित बहुजन गोरगरिबांना लढण्याची हिम्मत देणारे नेतृत्व असल्याचे उत्तर आज रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या मुंबई प्रदेश प्रमुख संघटक नैनाताई संजय वैराट यांनी दिले आहे यावेळी नागराज मंजुळेच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनहि करण्यात आले. या आंदोलनमध्ये जिल्हाध्यक्ष सो ना कांबळे हेमंत रणपिसे अमिना आरिफ खान शरफू खान शशिकला जाधव भगवान सावंत संजय जाधव राजेंद्र खरात आदी अनेक मान्यवर सहभागी झाले होते

नवी मुंबई येथील पत्रकार परिषदेत नामदार रामदास आठवले यांनी सैराट सिनेमाचे कौतुकच केले तसेच महाराष्ट्रात सैराट सिनेमावर वेगवेगळे आरोप होत असताना सैराट हा सिनेमा चांगला सिनेमा असल्याची बाजू रिपब्लिकन पक्षाने घेतली. लोकनेते रामदास आठवले यांनी सैराट चे समर्थन केले असताना त्या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आठवलेंबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते सैराटच्या यशाने वास्तव विसरून भान विसरलेल्या नागराज मंजुळेंना ध्यानावर आणण्यासाठी रिपाइंच्या वतीने आज मंजुळे च्या फोटोला जोडे मारो आंदोलन झाले यामध्ये देवेंद्र रणपिसे आरिफ तांबोळी मनोज रणपिसे सहभागी झाले होते दलित आदिवासींचे संरक्षण कवच असलेल्या ऍट्रोसिटी कायदा रद्द करू नये यासाठी हि निदर्शने करण्यात आली. 

Post Bottom Ad