पाकिस्तानच्या निषेधार्थ आणि सिड्कोच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचा मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाकिस्तानच्या निषेधार्थ आणि सिड्कोच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचा मोर्चा

Share This
मुंबई / प्रतिनिधी - नुकताच दहशतवादी हल्ला केल्याने भारताचे 17 जवान मृत्युमुखी पडले होते. हा हल्ला पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केल्याने या हल्याचा निषेध करत मृत भारतीय जवानांना रिपब्लिकन सेनेच्यावतीने आझाद मैदानात श्रद्धांजली वाहण्यात आली.

नवी मुंबईमधील 15 ते 20 वर्षापासून राहत असलेल्या झोपड़ीधारकांचे पुनर्वसन करावे, गावठाणालगत असलेल्या चाळींकरांचे पुनर्वसन करावे, रेलवेलगतच्या झोपडपट्यांचे पुनर्वसन करावे, तुर्भे येथील डंपिंग ग्राउंड हटवावे, सफाई कामगारांचे वेतन वाढवावे, कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे, प्रोपर्टी टैक्सवरील सावकारी व्याज माफ़ करावे इत्यादी प्रलंबित मागण्यासंदर्भात सिड्को आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजामिया पटेल, मुंबई अध्यक्ष रमेश जाधव यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र प्रमुख - काशिनाथ निकाळजे, सुनील कांगे, जॉय सालियन, जिवनभाई गायकवाड, संदीप कांबळे, रमेश मोहिते, भगवान साळवी, पी आर तांबे, दीपक केदार, महादेव पवार, गोडबोले ताई, खरात ताई आधी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages