बेस्टकडून वीज ग्राहकांची लूट ? बेकायदा १८३ कोटी रुपये वसूल केले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टकडून वीज ग्राहकांची लूट ? बेकायदा १८३ कोटी रुपये वसूल केले

Share This
मुंबई : शहर भागातील वीज ग्राहकांकडून परिवहन तूट वसूल करणे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही गेले तीन महिने ही बेकायदा वसुली सुरूच असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. आतापर्यंत बेस्टने अशा पद्धतीने दहा लाख वीज ग्राहकांकडून १८३ कोटी रुपये वसूल केले आहेत.
बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग गेली काही वर्षे आर्थिक नुकसानात आहे. ही तूट वीजपुरवठा विभाग ग्राहकांच्या वीज बिलातून वसूल करीत आहे. मात्र तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ही तूट वसूल बंद करण्याचे आदेश बेस्टला दिले होते. त्यानुसार गेली काही वर्षे सुरू असलेली ही बेकायदा वसुली तत्काळ बंद होणे अपेक्षित होते.

मात्र गेल्या तीन महिन्यांमध्ये बेस्टने या स्वरूपात ग्राहकांकडून तब्बल १८३ कोटी रुपये वसूल केले आहेत, ही बाब बेस्ट समितीच्या बैठकीत शनिवारी समोर आली. या प्रकरणात एखादी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यास वसूल केलेली ही रक्कम बेस्टला तत्काळ परत करावी लागेल. अशा वेळी एवढी मोठी रक्कम कुठून देणार, असा सवाल सदस्यांनी केला. परंतु तूट वसुलीचा मुद्दा महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगापुढे असल्याने याबाबत आता बोलणे उचित नाही, अशी सबब देत बेस्ट प्रशासनाने आपला बचाव केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages