मंत्रालयीन महिला कर्मचा-यांसाठी तीन दिवसीय मोफत तपासणी शिबीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2016

मंत्रालयीन महिला कर्मचा-यांसाठी तीन दिवसीय मोफत तपासणी शिबीर

मुंबई दि 17 : बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढले असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे स्तन कर्करोग राज्यस्तरीय जागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान शिबिरांतून सुमारे 2.5 लाख महिलांची विनामूल्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. इम्पॅथी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या सहाय्याने ही मोहिम राबविणार असल्याची माहिती वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे इम्पॅथी फाउंडेशनच्या सहकार्याने मोफत स्तन कर्करोग तपासणी मोहीमेचा शुभारंभ महाजन यांच्या हस्ते झाला. यानिमित्त आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. इम्पॅथी फांउडेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाजन पुढे म्हणाले की, गंभीर आजारावर तातडीने निदान होत नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागात आजारावर निदान करण्यासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. यामुळे अनेकदा रुग्‍ण दगावण्याचे प्रकार घडतात. तसेच महिलांमध्येही स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. यामुळे स्तन कर्करोगाबाबत जनजागृती करणे महत्वाचे असल्याचे राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग इम्पॅथी फांउडेशनच्या सहकार्याने राज्यभर अद्ययावत उपक्रमाद्वारे मोफत तपासणी, प्रशिक्षण व पुढील उपचार करणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

Post Bottom Ad