टॅक्सी चालकांना न्याय देण्यासाठी शासन सकारात्मक - दिवाकर रावते - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टॅक्सी चालकांना न्याय देण्यासाठी शासन सकारात्मक - दिवाकर रावते

Share This
मुंबई, दि. 1 : टॅक्सी चालकांना न्याय देण्यासाठी शासन सकारात्मक असून ओला, उबेर गाड्यांना नियमात बसविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज सांगितले.
टॅक्सी चालकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आज अंधेरी येथील परिवहन कार्यालय येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली टॅक्सी संघटनांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम, मुंबई मेन टॅक्सी युनियन लीडर ए. एल. कॉडरस, स्वाभिमानी टॅक्सी युनियनचे प्रतिनिधी, जय भगवान टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी, मुंबई टॅक्सी चालक-मालक सेनेचे प्रतिनिधी तसेच आदी मुंबई टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी, टॅक्सी चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ओला, उबेर गाड्यांच्या तक्रारी टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडण्यात आल्या. ओला, उबेर गाड्यांना टॅक्सी चालकांचा विरोध नसून ओला, उबेरला नियमात बसविण्यात यावे, अशी मागणी यावेळी संघटनांनी केली.

यावेळी रावते म्हणाले की, टॅक्सी चालकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करण्यात आली. केंद्र शासनही याबाबत सकारात्मक असून केंद्रीय मंत्री याबाबत निर्णय घेतील. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार टॅक्सी चालकांच्या मागणीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. यावेळी टॅक्सी, रिक्षा ओला,उबेरच्या स्पर्धेत टिकण्यासाठी मोबाईल ॲप, जीपीएस यासारखी सेवा युनियनने उपलब्ध करुन द्याव्यात, असेही त्यांनी टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुचविले.

यावेळी टॅक्सी बाहेर जाण्यास परवानगी, कॅरियर नसलेल्या वाहनांना परवानगी द्यावी की नाही, टॅक्सी चालकांच्या प्रश्नांसंदर्भात अभ्यासगट स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages