आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना अधिकृत स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना अधिकृत स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार

Share This
मुंबई, दि. 27 : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना अधिकृत स्पर्धामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच खेळाडुंनी अत्युकृष्ट कामगिरी दाखविण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद वगळता ऑलिंपिकमध्ये ज्या खेळ प्रकारांचा समावेश असेल त्याच स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळणे अनुज्ञेय राहील. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवास खर्च,प्रवेश शुल्क, निवास भोजन इ. देश-विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण,प्रशिक्षण उपकरणे, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क,प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य खरेदी करणे,गणवेश इ.बाबींकरीता अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.

याबाबतचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांचे कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल,सायन-बांद्रा लिंक रोड, धारावी बस डेपोजवळ, सायन (प.),मुंबई-17 येथे उपलब्ध आहेत. संबंधित अर्ज दि. 5 ऑक्टोबर 2016पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर येथे करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages