केंद्र शासनाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2016

केंद्र शासनाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 27 : केंद्र शासनाने ‘खेलो इंडिया-नॅशनल प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्पोटर्स’ या नावाने नवीन योजना सुरु केली आहे. यामध्ये ‘स्पोटर्स इन्फ्रास्ट्रक्चर’ या अंतर्गत खेळाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीची योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये सिंथेटिक अथलेटिक्स ट्रॅक, सिंथेटिक हॉकी मैदान, सिंथेटिक टर्फ फुटबॉल मैदान बहुउद्देशीय सभागृह, जलतरण तलाव इ. बाबींकरीता अनुदान देण्यात येणार आहे.
याबाबतचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांचे कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, सायन-बांद्रा लिंक रोड, धारावी बस डेपोजवळ, सायन (प.), मुंबई-17 येथे उपलब्ध आहेत. संबंधित अर्ज दि. 5 ऑक्टोबर 2016 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर येथे करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

Post Bottom Ad