पालिका शाळांमधील टॅब संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मनसेची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळांमधील टॅब संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मनसेची मागणी

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलेल्या टॅबमधील ५० टक्के टॅब नादुरुस्त आहेत , या टॅब मुले विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे किती कमी झाले , याचा वापर अभ्यासासाठी किती प्रमाणात होतो , दीड - दोन महिने झाले तरी दुरुस्तीसाठी दिलेले टॅब मुलांना परत मिळालेले नाही , पालिका प्रशासनाने आतापर्यंत सदर टॅब मध्ये किती अभ्यासक्रम डाउनलोड केलेला आहे. अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत म न से चे गटनेते संदीप देशपांडे यांनी टॅब प्रकरणी प्रशासनाने श्वेतपत्रिका काढून या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी स्थायी समितीत केली , पालिका शाळांमध्ये टॅब चार्जिंग करीता स्पाइक गार्ड चा पुरवठा करण्याच्या प्रस्तावावर ते बोलत होते.

या संदर्भात बोलताना देशपांडे यांच्या मुद्द्याला पाठिंबा देत मनसेचे संतोष धुरी यांनी स्पाइक गार्ड कोणत्या दर्जाचे वापरणार हे सदर प्रस्तावात स्पष्ट केले नसल्याचे निदर्शनास आणून दिले , सॉकेट किती पिन चे असणार आहे . त्याचा दर्जा काय , विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय काळजी घेतली आहे, असे सवाल केले . भा ज प च्या विठ्ठल खरटमोल यांनी ५० टक्के टॅब नादुरुस्त असल्याचे सांगितले. सदर प्रस्तावावर बोलताना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दफ्तारचे ओझे कमी करण्याचा टॅब देण्यामागचा उद्देश असल्याचे सांगत आता विद्यार्थ्यांना शाळेतच टॅब चार्ज करता येणार असल्याने सदर प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली , त्यानुसार सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages