नागपुरातील बुध्दिस्ट सर्कीटसाठी केंद्र शासन देणार 100 कोटी - डॉ. महेश शर्मा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2016

नागपुरातील बुध्दिस्ट सर्कीटसाठी केंद्र शासन देणार 100 कोटी - डॉ. महेश शर्मा

नवी दिल्ली, 7 : दिक्षा भूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोली या भागांना जोडणारा नागपुरात प्रस्तावीत असलेल्या बुध्दिस्ट सर्कीटसाठी केंद्र शासनाच्या ‘स्वदेश दर्शन योजने’तून 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी दिली.
परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुध्दिस्ट सर्कीट संदर्भात बैठक झाली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकरी यावेळी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धर्मांतर केलेले नागपुरातील दिक्षा भूमी हे ठिकाण, जपानीस्थापत्य शैलीवर आधारीत नागपुर-कामठी मार्गावरील ड्रॅगन पॅलेस आणि नागपूर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय असलेले चिंचोली यांना जोडण्यासाठी बुध्दीस्ट सर्कीट उभारण्यात येणार आहे. नागपुरात देश-विदेशातून येणारे पर्यटक व बुध्द धर्माचे अनुयायी यांना दिक्षा भूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोलीला सुलभरित्या भेट देता यावी यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. बुध्दीस्ट सर्कीटसाठी राज्य सरकार आर्थिक मदत करणार असून केंद्र शासनानेही या प्रकल्पास मदत करावी अशी मागणी यावेळी राज्यशासनाच्यावतीने करण्यात आली. ही मागणी मान्य करत डॉ. महेश शर्मा यांनी पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत बुध्दिस्ट सर्कीटसाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने दि. 21 ते 23 सप्टेंबर 2016 दरम्यान आयोजित करण्यात येणा-या ‘अतुल्य भारत गुंतवणूक परिषदेत’महाराष्ट्र शासनाच्यावतीने बुध्दिस्ट सर्कीटबाबत मांडणी करावी.त्यामुळे परदेशी कंपन्यांकडूनही आर्थिक मदत मिळेल अशी सूचनाही डॉ. महेश शर्मा यांनी यावेळी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS