आरपीएफ जवानांचा तरुणीवर दिवा पोलिस चौकीतच बलात्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरपीएफ जवानांचा तरुणीवर दिवा पोलिस चौकीतच बलात्कार

Share This
ठाणे - रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी केलेल्या कृत्याने पोलसांच्या नावाला काळीमा फासला गेला आहे. असहाय्य 23 वर्षीय तरुणीला धमकावत आरपीएफच्या जवानांनी दिवा रेल्वे स्थानकातील पोलिस चौकीतच बलात्कार केल्याची घटना तरुणीने आठ महिन्यानंतर केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आली आहे. मुंब्रा पोलिसांनी यासंदर्भात आरपीएफच्या तीन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशातून नुकतीच डोंबिवली येथे राहण्यास आलेल्या 23 वर्षीय तरुणीला दिव्या स्थानकावर गस्त घालणार्‍या दीपक राठोड, महेंद्र सिंग, बी. के. सिंग यांनी हटकले. ती मुंबईत नवीन असल्याचे हेरून तिला खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी देत चौकशीसाठी दिव्याच्या आरपीएफ चौकीत आणण्यात आले.

त्यानंतर या तरुणीवर 14 जानेवारी रोजी चक्क आरपीएफच्या चौकीतच अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने लोहमार्ग पोलीस ठाण्यात आठ महिन्यांनंतर नोंदविली. भेदरलेल्या तरुणीने पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्याची त्यावेळी हिंमत दाखवली नाही. ती ब्युटीशियनचे काम करीत होती. ठाणे परिसर तिला नवीन असल्याने तिने आठ महिन्यांनंतर गुन्हा दाखल केला. तरुणीच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात तिघांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मुंब्रा पोलीस करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages