कॉमेडिन कपिलकडे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी मागितली ५ लाखांची लाच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॉमेडिन कपिलकडे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी मागितली ५ लाखांची लाच

Share This
मुंबई - कॉमेडिन शो चालवणाऱ्या कपिल शर्माने मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली असल्याचा आरोप केला आहे. कपिलने ट्विटरवर हा आरोप केला असून हा ट्विट त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केला आहे. कपिलच्या या आरोपामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

मुंबईत कपिलच्या ऑफीस संदर्भात कागदपत्रांच्या पुतर्तेसाठी हे पैसे मागितले, असे कपिलने म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांत मी १५ कोटी रुपयांचा इनकम टॅक्स भरला आहे, तरीही मला ऑफीस घेण्यासाठी ५ लाखांची लाच द्यायची वेळ येते. हेच अच्छे दिन आहेत का? असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे. कपिलच्या आरोपाची मुख्यमंत्र्यांनी तसेच मुंबई महापालिकेने दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. कपिलने संबंधित अधिकाऱ्यांचे नाव सांगीतल्यास त्यांच्यावर कारवाई करता येईल असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages