मुंबई, दि. 7 : राज्यातील तलाठ्यांच्या प्रश्नांबाबत शासन नेहमीच सकारात्मक आहे. तलाठ्यांनी 7/12 संगणकीकरण व दुरुस्त्यांबाबतचे कामतातडीने पूर्ण करुन डिजिटल इंडिया मोहिमेस हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत ई-म्युटेशनबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,राज्यमंत्री संजय राठोड, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचेसचिव विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, जमाबंदी आयुक्त संभाजी कडू पाटील, महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वयमहासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे यांच्यासह भारत संचार निगम लि. व राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (NIC)चे अधिकारी, तलाठी महासंघाचे पदाधिकारीउपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 7/12 संगणकीकरण व त्यामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी तलाठ्यांना ज्या अडचणी येत आहेत, त्या सोडविण्यासाठी सर्वसंबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. त्याचबरोबर तलाठ्यांनी 7/12 संगणकीकरणामधील दुरुस्त्या येत्या तीन महिन्यात पूर्णकरुन खातेदारांना बिनचूक संगणकीकृत 7/12 उपलब्ध करुन द्यावा. बिनचूक संगणकीकृत 7/12 ही डिजिटल महाराष्ट्राची महत्त्वाची उपलब्धी असेल, असे सांगून राज्यातील तलाठ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील 357 तालुक्यांमध्ये 7/12 संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात 2 कोटी 45 लाख 52 हजार 246 खातेदार आहेत. राज्यात 2437तालुका व मंडळाच्या ठिकाणांपैकी 1658 ठिकाणी संगणकीकरणाचे काम करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये वाढ करण्याबरोबरच सर्व्हरचा स्पीडवाढविणे, ॲप्लिकेशनमध्ये बदल व कनेक्टिव्हिटी वाढविणे या अडचणी सोडविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या बैठकीत तलाठ्यांची रिक्त पदे भरणे, प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, कार्यालयांसाठी इमारत बांधणे, तसेच त्यांना लॅपटॉप व प्रिंटर देणे आदीविषयांवर चर्चा करण्यात आली.