बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह सर्व सोयी-सुविधांनी सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2016

बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह सर्व सोयी-सुविधांनी सज्ज

मुंबई - बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह सर्व सोयी-सुविधांनी सज्ज झाले असून बृहन्मुंबई महापालिका प्रशासनातर्फे नागरिक व व्यापाऱयांकरिता सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
या सेवा-सुविधांमध्ये नियमित ४०,००० हजार चौ.मी. वाड्यांशिवाय अतिरिक्त ४०,००० हजार चौ.मी. चे पावसाळी शेड बांधण्यात आले आहे. त्यामुळे पशुवधगृहात येणाऱया जनावरांना निवाऱयांसाठी जादा जागा उपलब्ध झाली आहे. देवनार पशुवधगृहात आवश्यक तेथे सिमेंट कॉक्रीटचे रस्ते बनवून इतर रस्त्यांवर डांबर टाकून घेण्यात आले आहे. जनावरे उपरण्याच्या धक्क्याची सिमेंट कॉक्रीटकरण करुन दुरुस्ती करुन घेण्यात आली आहे. देवनार पशुवधगृहाच्या मैदानी भागात व अतिरिक्त उभारलेल्या पावसाळी शेडमध्ये तंत्राव्दारे रस्ते बनविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गटारांची दुरुस्ती करुन साफसफाईची कामे करण्यात आली आहे.

देवनार पशुवधगृहामध्ये प्रवेश करणाऱया बकऱयांचे निशुल्क धार्मिक पास व्यापाऱयांच्या ताब्यात देऊन ते विक्री पश्चात खरेदीदाराच्या ताब्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरेदीदाराने सदर पासाची एक प्रत प्रवेशव्दारावर देऊन दुसरी प्रत स्वतः ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सदर निशुल्क पासांबाबत ठिकठिकाणी जाहिरात करण्यात आली असून सूचना फलक लावून व हॅन्ड बिल्स वाटप करुन जनजागृती केली आहे. देवनार पशुवधगृहात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला असून चार हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे आहे. ८०८०४१११३२, ८०८०४१११७२, ८०८०४१११७६, ८०८०४१११८६ असे आहेत. 

संपूर्ण परिसरातील देखरेखीसाठी ९६ सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आवश्यक त्या प्रमाणात सदर व्यवस्था कार्यरत राहण्यासाठी १५ विद्यूत जनित्रे व अतिरीक्त विद्यूत मीटर घेऊन पुरेशी विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या खान-पान सेवेसाठी फूड झोनची व्यवस्था करण्यात आली आहे. कुर्बानीसाठी येणाऱया जनावरांची संख्या नागरिकांना अवगत व्हावी यासाठी प्रवेशव्दारावर ३ डिजिटल इडिकेटर बसविण्यात आले आहेत. पोलिसांसाठी वॉच टॉवर व चौक्या उभारण्यात आल्या आहेत. 

नागरिकांकरिता ४ सुलभ शौचांलयाव्यतिरिक्त ५० मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिलांकरिता स्वतंत्र टॉयलेट व स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांकरिता ८ पाणपोयांची तसेच जनावरांकरीता विविध ठिकाणी ८० पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यापाऱयांकरिता मोफत २ वैद्यकीय दवाखाने व ४ रुग्णवाहिका व जनावरांच्या उपचारासाठी ४ पशुवैघकीय दवाखाने उभारले आहे. देवनार पशुवधगृहात मोक्याच्या जागेवर दिशादर्शक फलक, मार्गिका व नकाशे लावण्यासोबतच मोठया जनावरांच्या वधासाठी बंदिस्त जागा सर्व सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS