मराठ्यांच्या ओबीसीकरणाला कायम विरोध राहील - संजय कोकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मराठ्यांच्या ओबीसीकरणाला कायम विरोध राहील - संजय कोकरे

Share This
मुंबई / प्रतिनिधी, दिनांक 21 Sep 2016
मराठा समाज आरक्षण मिळावे म्हणून प्रत्येक जिल्ह्यात लाखोंचे मोर्चे काढत आहे. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने नेमलेल्या विविध आयोगाने नकार दिलेला आहे. तरीही ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाला घुसवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल असा इशारा ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत कोकरे बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असल्यास ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता वेगळे आरक्षण द्यावे त्याला आमचा विरोध राहणार नाही असे कोकरे यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा कोकरे यांनी दिला आहे. ओबीसीमधील भटक्यांनाही जातीय वर्चस्वाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एट्रोसिटी कायदा कडक करत या कायद्यात ओबीसीमधील भटक्यानाही समावेश करावा अशी मागणी कोकरे यांनी केली. ओबीसी समाजाला कोणतेही हालअपेष्टा सहन न करता आरक्षण मिळाले असल्याने या आरक्षणाची आणि हे आरक्षण मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची किंमत नसल्याची खंत कोकरे यांनी व्यक्त केली.

"नवे पर्व ओबीसी सर्व" ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमीलेअरची व १९६१ च्या पुराव्याची अट रद्द करावी व इतर मागण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढले जाणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व कोणीही करणार नसून यामध्ये ओबीसी समाजातील सर्व राजकीय नेते व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होतील. २० ऑक्टोबरला बीड जिल्ह्यात, ८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला जाणार आहे. ओबीसीमधील सर्व जाती, जमातीं मोर्चांमधे सहभागी होणार या माध्यमातून "नवे पर्व ओबीसी सर्व" हा संदेश सर्वत्र पोहचवला जाणार असल्याची माहिती कोकरे यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages