सोमवारी मातंग समाजाचा मंत्रालयावर मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सोमवारी मातंग समाजाचा मंत्रालयावर मोर्चा

Share This

मुंबई / प्रतिनिधी
मातंग समाजाला 8 टक्के आरक्षण मिळावे या मागणी साठी बाबासाहेब गोपले अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. नुकतेच गोपले यांचे निधन झाल्या नंतर आरक्षणाच्या मागणीसाठीचा लढा गोपले यांच्या पत्नी कुसुम गोपले यांनी सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवार 26 सप्टेंबर रोजी मंत्रलायावर मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव बनवून केंद्र सरकारकडे सदर करावा, भायखळा येथील खुल्या लोकशाहीर अन्नाभाऊ साठे नाट्यगृहाची त्वरित दुरुस्ती करावी, अन्नाभाऊ साठे महामंडळाचे भागभांडवल दोन हजार कोटी रुपयांनी वाढवावे इत्यादी मागण्यासाठी हा मोर्चा असल्याचे कुसुम गोपले यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages