आठवले यांच्या अपमाना प्रकरणी रिपाईची निदर्शने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आठवले यांच्या अपमाना प्रकरणी रिपाईची निदर्शने

Share This
मुंबई / प्रतिनिधी - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या पदाचा मुंबई रेल्वेने अवमान केल्या प्रकरणी मुंबई सीएसटी मुख्यालय येथे आरपीआय (आठवले) पक्षाच्या वतीने डीआरएम कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार सांगली येथे आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यासाठी आठवले 2 सप्टेंबरला सीएसटी स्थानकातून रेल्वेने प्रवास करणार होते. आठवले हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना प्रथम श्रेणीचे तिकिट देने गरजेचे असताना द्वितीय श्रेणीचे तिकिट देण्यात आले. रेलवे अधिकाऱ्यानी राजशिष्टाचाराचा अवमान करत केंद्रीय मंत्र्याचा अपमान केला असल्याने दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सो ना कांबले, रमेश गायकवाड, भगवान सावंत व कार्यकर्त्यानी मंगळवारी डीआरएम कार्यालयावर निदर्शने केली. डीआरएम रविंद्र गोयल यांनी निवेदन स्विकारण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी यावे अशी भूमिका आंदोलनकर्त्यानी घेतल्याने गोयल यांनी आँदोलनाच्या ठिकाणी येवून निवेदन घेतले. यावेळी राजशिष्टाचार धाब्यावर बसवून केंद्रीय मंत्र्याचा अवमान करणाऱ्या रेलवे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा रिपाईच्या वतीने रेलरोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages