आदिवासींना न्याय देऊन क्रान्तिविर बिरसा मुंडांचे स्वप्न साकार करणार - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आदिवासींना न्याय देऊन क्रान्तिविर बिरसा मुंडांचे स्वप्न साकार करणार - रामदास आठवले

Share This
रांची - आदिवासी समाजाला आर्थिक सामाजिक न्याय देऊन त्यांचा संपूर्ण विकास साधून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आदिवासींना न्याय देऊन त्यांचा विकास साधण्याचे क्रान्तिविर बिरसा मुंडा यांचे स्वप्न साकार करणार असा निर्धार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला. रिपाइंच्या झारखंड राज्य शाखेतर्फे रांची येथील दिगंबर जैन धर्मशाला सभागृहात नामदार रामदास आठवले यांचा केंद्रिय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला यावेळी विचारमंचावर मंजू छिबेर, चंदन शर्मा तसेच रिपाइंचे झारखंड प्रदेशाध्यक्ष मोहन पांडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना आठवले म्हणाले कि, झारखंड हे आदिवासीबहुल राज्य सन 2000 मध्ये स्थापन झाले या राज्याला अधिक प्रमाणात विकास निधी मिळवून देऊ त्यासाठी प्रधानमंत्रयांची भेट घेऊ,  झारखंड मधील खान कामगारांच्या आरोग्याचे संरक्षणाचे निवाऱ्याचे तसेच योग्य उत्पन्न वेतनाचे प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. खानकमगारांच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणाची सोय करणार. भारत सरकार द्वारे खाणकांगारांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आठवले म्हणाले. यावेळी देशात रिपब्लिकन पक्ष दलित आदिवासी अल्पसंख्यानकांना एकजूट करून राजकीय ताकद उभारत असल्याचे आठवले म्हणाले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages