रिपाईच्या वतीने वांद्रे येथे रोजगार मेळावा संपन्न - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिपाईच्या वतीने वांद्रे येथे रोजगार मेळावा संपन्न

Share This
मुंबई / प्रतिनिधी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,रोजगार आघाडी यांच्या विद्यमाने सुभाष नगर,वांद्रे पूर्व येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर तर प्रस्ताविक मुंबईचे नेते रतन अस्वारे यांनी केले,अमित तांबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या मेळाव्यात एकूण ५०० खासगी कंपन्यांने सहभाग नोंदविला होता,तसेच हजारो तरुणांनी या मेळाव्यात प्रवेश केला होता. या रोजगार मेळाव्यात १४० उमेदवा-यांची निवड करण्यात आली.या विजयी उमेदवा-यांना रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्षा सिमाताई आठवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र व कॉल लेटर देण्यात आले.खेरवाडीचे सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील,राष्ट्रीय सचिव शीलाताई गांर्गेुडे,अॅड.आशाताई लांडगे,जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव,केरळचे अजोय इटी,अॅड.अभया सोनावणे,गीता कपूर,स्नेहा भालेराव, विवेक पवार,सिध्दार्थ कासारे,बाबा बि-हाडे,नागेश तांबे,सुनील बोर्डे,आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.या मेळाव्यात जीएसपीके कंपनी,हिंदुस्थान टाइम्स,टाइम्स प्रो,आयटीएम ग्रुप,निशा सुरक्षा एजेंन्सी,टीएमआय,होम क्रेडीट कंपनी,मिनल पुल,लिनक्या ग्रुप,एअर फोर्ट जॉब,,युरीका फोर्ब,टाटा रिटेल ग्रुप,कोटक बँक,आयडीबीआय बँक,कोटक बँक,इंडिया टेलीकॉम प्रा.कंपनी.इत्यादि कंपनीने सहभाग नोंदवला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages