माफी मागा नाहीत खटल्याला तोंड द्या - उत्तम खोब्रागडेंना रत्नाकर गायकवाड यांची नोटीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माफी मागा नाहीत खटल्याला तोंड द्या - उत्तम खोब्रागडेंना रत्नाकर गायकवाड यांची नोटीस

Share This
मुंबई - आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेले आंबेडकर भवन पाडल्यानंतर माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे माजी मुख्य सचिव आणि विद्यमान माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांबाबत गायकवाड यांनी खोब्रागडे यांना वकीलाकडून कायदेशीर नोटीस बजावली असून माफी मागण्याची मागणी केली आहे. आंबेडकर भवनचा वाद सध्या उच्च न्यायालयात सुरु असताना आंबेडकरी चळवळीतील दोघा आंबेडकरी माजी आएएस अधिकाऱ्यांतला वादही आता सुरु झाला आहे.

१९ आॅगस्ट रोजी उत्तम खोब्रागडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये रत्नाकर गायकवाड यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) चेअरमन असाताना तसेच राज्याचे मुख्य सचिव असताना अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. बेछुट आणि बिनबुडाचे आरोप केल्याबाबत रत्नाकर गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयातील प्रक्टीसींग वकील अ‍ॅड. संतोष सांजकर यांच्यामार्फत शुक्रवारी नोटीस बजावली आहे.

दादरचे आंबेडकर भवन एका बिल्डरच्या घशात घालण्यासाठी गायकवाड यांच्या आदेशाने पाडण्यात आले. एमएमआरडीएचे चेअरमन असताना गायकवाड यांनी कांदीवली आणि ओशिवरा येथील भूखंड एका बिल्डरला बेकायदा दिले. बृहन्मुंबई बहुजन पतपेढी आणि मातोश्री वृद्धाश्रम या संस्थांना झी ग्रुपकडून करोडोंच्या देणग्या मिळवून दिल्या आदी आरोप खोब्रागडे यांनी त्या पत्रकार परिषदेत केले होते.

नोटीसी मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत उत्तर द्यावे आणि लेखी माफी मागावी. अन्यथा भादवि ४९९ आणि ५०० नुसार फौजदारी दावा दाखल करण्यात येईल असे खोब्रागडे यांना नोटीसीव्दारे सुनावण्या आले आहे. उत्तम खोब्रागडे सध्या निवृत्त आहेत, तसेच ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात कार्यरतही आहेत. आठवले यांनी आंबेडकर भवनाच्या वादात गायकवाड यांच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. त्याचवेळी खोब्रागडे यांनी मात्र गायकवाड यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन गायकवाड यांच्यावर अनेक आरोप केले होते. 

वादाचे मूळ 
आमचे अशील रत्नाकर गायकवाड राज्याचे मुख्य सचिव होते, त्यावेळी तुम्ही आदिवासी विकास विभागाचे सचिव होता. तेव्हा त्या विभागाचा पाचशे कोटीचा निधी न वापरता आपण केंद्राला परत पाठवला होता. तेव्हा मुख्य सचिव या नात्याने आमच्या अशिलाने तुमच्यावर विभागांतर्गत चौकशी लावली होती. त्याला अद्याप केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण तसेच उच्च न्यायालयानेही आपण मागणी करुनही सूट दिली नाही. तुमची अद्याप चौकशी चालु आहे. तो राग तुम्ही मनात ठेवून आमचे अशील रत्नाकर गायकवाड यांच्याविरोधात पत्रकार परिषदेत सूडबुद्धीने खोटेनाटे आरोप केले आहेत, असे या नोटीसीत म्हटलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages