कोकणातील आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोकणातील आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत

Share This
मुंबई, दि. 26 : परतीच्या पावसामुळे कोकणात नैसर्गिक आपत्ती उद्भवली. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून साह्य मिळविण्यासाठी पाठपुरावा केला असून, त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. पूल व रस्ते वाहून गेले असून खेड तालुक्यातील वेरळ गाव, बोरघर, किंजळे, शिंगरी, पुरे, घोगरे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे, घरांचे, रस्त्यांचे, विहीरींचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे व्यापारी आणि नागरिक यांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला होता. या परिस्थितीचा आढावा घेऊन श्री. कदम यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून पूर परिस्थितीचा अहवाल मागविला असून, आर्थिक मदत करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages