मुंबई, दि. 27 : अल्पसंख्याक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक शाळांनी सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात गृह, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-400 001 यांचेकडे दि. 30/09/2016 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा यांनी कळविले आहे. याबाबतचा शासन निर्णय व अर्जाचा नमुना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.