Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कुर्ला परिसरात ४, ५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे ‘एल’ विभाग, साकीनाका जंक्शन येथील ब्ल्यू स्टार कंपनीजवळ, कुर्ला (दक्षिण) व कुर्ला (उत्तर) या मुख्‍य जलवाहिनीच्‍या जोडणीवरच्‍या ३०० मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम मंगळवार, दिनांक ४ ऑक्टोबर, २०१६ रोजी सकाळी ९ वाजेपासून बुधवार, दिनांक ५ ऑक्टोबर, २०१६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत (एकूण २४ तास) हाती घेण्यात येणार आहे.

सदर कामाच्या कालावधीत ‘एल’ विभाग येथील प्रभाग क्रमांक १२३ व प्रभाग क्रमांक १५० ते १६४ मधील गुरुनानक नगर, लालबहादूर शास्त्री मार्ग (महिंद्रा पार्क ते महाराष्ट्र काटा) कुर्ला स्थानक, तकियावार्ड, पाईपरोड, हॉल रोड, न्यू मील रोड, ब्राह्मणवाडी, कमानी, ख्रिश्‍चन गांव, स्वदेशी मील मार्ग, वाडिया इस्टेट, कसाईवाडा, कोहिनूर, काजूपाडा जलवाहिनी मार्ग, ९० फुटी रस्ता, खाडी क्रमांक ३, शास्‍त्री नगर, जरीमरी, साकीनाका, घाटकोपर - अंधेरी जोडरस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, अशोक नगर, मिलिंद नगर, के. बी. एम. कंपाऊंड या संपूर्ण विभागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही

सदर नमूद केलेल्या परिसरामधील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करावा व पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिनांक ४ ऑक्टोबर, २०१६ रोजी सकाळी १० वाजेपासून पुढील ४८ तासांकरीता पाणी गाळून व उकळून वापरावे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom