मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 मधे होत आहे. यासाठी मतदार नोंदणी अभियान सुरु आहे. या अभियाना दरम्यान 100 टक्के मतदार नोंदणी करणाऱ्या गृहनिर्माण संस्थाना 10 हजाराचे बक्षिस देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका 15 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या दरम्यान विशेष मतदार नोंदणी अभियान राबवत आहे. या अभियाना दरम्यान 18 वर्षे पूर्ण झालेल्यानी आपले नाव मतदार यादीमधे नोंद करावे, ज्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूकी वेळी मतदान केले आहे अश्या मतदारानी आपले नाव 1 जानेवारी 2017 च्या यादीमधे आहे की नाही याची खात्री करावी, जे मृत झाले असतील त्यांची नावे यादी मधून वगऴावीत, ज्यांनी स्थलांतर केले आहे अश्या मतदारानी आपण राहत असलेल्या विभागात आपले नाव मतदार यादीमधे समावेश करून घ्यावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

मतदारांची संख्या वाढावी म्हणून रहिवाशी सोसायटीमधे अध्यक्ष चिटणिस यांच्याकडे नोंदणी फॉर्म देण्यात येणार आहेत. मतदारांची 100 टक्के नोंदणी करणाऱ्या सोसायटीना तीन बक्षीसे देण्यात येणार आहेत अशीच बक्षीसे महाविद्यालयाला, मतदार नोंदणी अधिकाऱ्यालाही देण्यात येणार आहेत. ही सर्व बक्षीसे रोख स्वरूपात असतील असे देशमुख यांनी सांगितले.
मतदार नोंदणी बाबत काही माहिती हवी असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे संकेतस्थळ ceo.maharashtra.gov.in टोलफ्री नंबर 1800221950 वर संपर्क साधावा असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. पालिका निवडणूकीच्या मागासवर्गीय प्रभागांची सोडत 3 ऑक्टोबर रोजी रंग शारदा येथे होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.