महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना 2016 चा मसुदा प्रसिध्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2016

महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना 2016 चा मसुदा प्रसिध्द



सूचना व हरकती करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 20 : शासनाने महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना 2016 चा मसुदा प्रसिद्ध केला असून या मसुद्याबाबत जनतेकडून सूचना अथवा हरकती मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन उपायुक्त(अंमल-1) पुरुषोत्तम निकम यांनी दिली आहे.


ॲग्रिकेटर कंपन्यांद्वारे चालविण्यात येणाऱ्या टॅक्सी सेवांचे नियमन करण्याच्या दृष्टीने सदर मसुदा दि. 15 ऑक्टोबर 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. सदर मसुद्याची इंग्रजी व मराठी प्रत www.mahatranscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जनतेकडून मसुद्याबाबत सूचना व हरकती परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 4 था मजला, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051 या पत्त्यावर पाठविण्यात यावे किंवा feedback.tpt-mh@gov.in या ई-मेलवर दिनांक 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत पाठविण्यात आल्यास या हरकती अथवा सूचनांचा विचार करण्यात येईल, असेही परिवहन उपायुक्त (अंमल-1) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post Bottom Ad