बेस्ट 6 इलेक्ट्रिक बस घेणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट 6 इलेक्ट्रिक बस घेणार

Share This

मुंबई / प्रतिनिधी
आर्थिक स्थिती खराब असलेला बेस्ट उपक्रम पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी 6 इलेक्ट्रिक मिडी बस घेणार असल्याचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे सादर करण्यात आला आहे.

मुंबईमधील अरुंद रस्ते, काही ठिकाणी असलेले उंच भाग यावर बेस्ट बसेस चालवणे कठीण असते. डिझेलमुले पर्यावरणावरही परिणाम होत असतो. यावर उपाय म्हणून बेस्ट उपक्रमाने पर्यावरण पूरक असलेल्या इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा विचार केला आहे. या बसेसमध्ये लिथियम ब्याटरी असून 30 मिनिटे चार्ज केल्यावर 160 किलोमीटर बस धावू शकणार आहे. मुंबई महानगरपालिकेने आपल्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक बसेस विकत घेण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी बेस्टला 31 मार्च 2017 पूर्वी खर्च करावा लागणार असल्याने बेस्टने इलेक्ट्रिक बससाठी टेंडर काढले आहे. दोन कंपन्याकडून बेस्टने बस 6 बसेस घेण्याचे नक्की केले आहे. एका कंपनी कडून 4 तर दुसऱ्या कंपनीकडून 2 बसेस घेतल्या जाणार असून एका बसची किंम्मत 1 करोड़ 63 लाख रुपये निश्चीत करण्यात आली आहे. मुंबईमध्ये बेस्ट विज पुरवठा करत असल्याने चार्जिंग करण्यास कोणत्याही प्रकारची अड़चण येणार नसून मुंबईमधील उंच आणि छोट्या रोडवर या बस फायदेशीर ठरणार आहेत. येत्या बेस्ट समिती बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages