धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्पातील पथदर्शी इमारतीत शुक्रवारी देणार सदनिकांचा ताबा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्पातील पथदर्शी इमारतीत शुक्रवारी देणार सदनिकांचा ताबा

Share This
धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्पातील पथदर्शी इमारतीत शुक्रवारी देणार सदनिकांचा ताबा 
मुंबई , दि. २६ ऑक्टोबर २०१६ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण {म्हाडा} चा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ चा पुनर्विकास केला जात आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत "म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर शुक्रवार, दि. २८ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी अकरा वाजता सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे.

"म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणारी "म्हाडा" सर्वसामान्य नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याकरिता सतत प्रयत्नशील आहे. या माध्यमातून पात्र झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न म्हाडातर्फे केला जाणार आहे. दि. १८ ऑक्टोबर २०१६ रोजी क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना चिट्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्याबरोबरच पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे- २०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages