मुंबई दि 14 - नाशिक जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून मराठा समाजातील काही समाजकंटकांकडून दलित समाजाच्या वस्त्यांना टार्गेट करून हल्ले करण्यात येत आहेत इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव प्रमाणे अनेक गावांत जातीवादी समाजकंटकांनी दलितांवर हल्ले केले आहेत त्यातून संपूर्ण जिल्ह्यात दलित मराठा समाजात ताणावस्थिती निर्माण झाली आहे .त्यातून विध्वंसक संघर्ष उभा राहू नये ; दोन्ही समाजातील तणाव निवळून शांतता स्थापित व्हावी; पीडितांना न्याय मिळावा ; दलितांना संरक्षण मिळावे यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते केंद्रियराज्यमंत्री नामदार रामदास आठवले दि 15 ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. नामदार रामदास आठवले नाशिक शहरात पोलीस प्रशासनाची बैठक घेणार असून दलितांना न्याय आणि संरक्षण देण्याबरोबरच दलित मराठा समाजातील तणाव मिटविण्याबाबत उपाययोजना ठरविण्यात येतील असे रिपाइंतर्फे कळविण्यात आले आहे
त्र्यम्बकेश्वर तालुक्यात तळेगाव अंजेनरी या गावात अल्पवयीन मराठा मुलीवर अत्याचार झाल्याच्या बातमीतून जिल्ह्यातील दलितवस्त्यांवर मराठा समाजाकडून हल्ले करण्यात आले पोलीस संरक्षण दिले असताना काही ठिकाणी पोलिसांनी कर्तव्यात केलेल्या कसूरमुळे दलितांवर हल्ले झाले याहल्ल्यांचा रिपाइंतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे तळेगावात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील विनयभंगाचा रिपाइंने तीव्र निषेध केला आहे मात्र आरोप खरा की खोटा याची खात्री न करता थेट आरोपीच्या जातील टार्गेट करून हल्ले करणे हे कोणत्याही समाजाचे काम नसून समाजकंटकच असा दोन समाजात तणाव तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत अश्यावेळी दलित आणि मराठा दोन्ही समाजाने सावध होऊन संयम आणि शांतता राखण्याचे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले आहे याकाळात पोलिसांनी निष्पक्षपणे कारवाई करून त्यांच्यावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करावा असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले आहे