आगींवर नियंत्रण आणण्यासाठी ‘बिल्डिंग मॅपिंग’ सॉफ्टवेअर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आगींवर नियंत्रण आणण्यासाठी ‘बिल्डिंग मॅपिंग’ सॉफ्टवेअर

Share This

Image result for mumbai fire brigade images

मुंबई 19 Oct 2016 — मुंबईत इमारतींना लागणार्‍या आगींवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाने ‘बिल्डिंग मॅपिंग’ सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये मुंबईतील सर्व इमारतींच्या अग्निप्रतिबंधक यंत्रणांचा लेखाजोखा राहणार आहे. ज्या सोसायट्यांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना केल्या नाहीत त्यांची माहिती अग्निशमन दलाला कळणार असून त्यामुळे संबंधित सोसायट्यांवर खटले दाखल करता येणार असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितले. 

दादर पूर्व येथील अग्निशमन केंद्राच्या नव्या इमारतीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभात रहांगदळे यांनी ही माहिती दिली. अग्निशमन दलाने बिल्डिंग मॅपिंग हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे इमारतींचे परीक्षण केले जाणार आहे. त्यामुळे इमारत ज्या विभागात आहे त्याचे नाव, इमारतीचे नाव, इमारत किती मजली आहे, इमारत किती जुनी आहे, इमारतीत अग्निप्रतिबंधक योजना आहेत का, त्या कधी बसविल्या आदी सर्व लेखाजोखा या सॉफ्टवेअरमध्ये राहणार आहे. तसेच इमारत मेंटेनन्ससाठीचा ‘बी’ फॉर्म आणि इमारतीची एनओसीसुद्धा या सॉफ्टवेअरला लिंक करण्यात येणार असून इमारतीच्या तपासणीचा हा सर्व अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर जनतेसाठी सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे रहांगदळे म्हणाले. 

इमारतीचे परीक्षण करण्यासाठी ७० अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईलमध्येसुद्धा असेल. त्यामुळे इमारतीचे परीक्षण केल्यानंतर ज्या अग्निप्रतिबंधक योजना कार्यान्वित नसतील त्याचा फोटो काढून पुरावा म्हणून बिल्डिंग मॅपिंगच्या लिंकवर टाकण्यात येणार आहे. कांदरपाडा येथे नवीन अग्निशमन केंद्र दहिसरच्या कांदरपाडा येथे लवकरच नवीन अग्निशमन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच २० मिनी फायर इंजिन घेण्यात येणार असून ज्या ठिकाणी अग्निशमन केंद्र निर्माण करता येत नाही अशा ठिकाणी या २० पैकी १७ फायर इंजिन मशीन देण्यात येणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages