मृताच्या नातेवाईकांना 10 लाख तर जखमीना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्या
मुंबई / अजेयकुमार जाधव 19 Oct 2016बांद्रा बेहराम पाढा येथे अनधिकृत बांधकाम कोसलून 13 जण जखमी तर 6 लोकांचा मृत्यु झाला. ही घटना सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे झाल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका डॉ. गुलिस्तां शेख यांनी केला आहे. त्या मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी शेख यांनी मृताच्या नातेवाईकांना 10 लाख जखमीना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी तसेच रहिवाश्यांचे पुनर्वसन याच विभागात करावे अशी मागणी केली आहे.
13 ओक्टोबरला बांद्रा बेहराम पाढा येथे अनधिकृत बांधकामुळे 6 निष्पाप लोकांचा मृत्यु झाला आहे. या विभागाचा विकास करावा म्हणून गेले 4 वर्षे सरकार दरबारी पाठपुरावा करत आहे. परंतू रेलवे प्रशासनाच्या आड़मुठ्या भूमिकेमुळे बेहरामपाढयाचा विकास होऊ शकलेला नाही. राज्य सरकारने वेळीच रेल्वे प्रशासनाशी केंद्राशी समन्वय साधून या विभागाचा विकास केला असता तर दुर्घटना टाळता आली असती तसेच निष्पाप लोकांचा जीवही वाचवता आला असता असे शेख यांनी म्हटले आहे.
बेहरामपाढा येथे स्थानिक रेलवे अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेकायदा कारखानदार व बांधकाम कंत्राटदार अनधिकृत बांधकामे करून त्यांना संरक्षित करीत आहेत. यामुळे हे 6 मृत्यु नैसर्गिक नसून प्रशासनाने त्यांचा खून केला आहे. या विभागात दलित आणि मुस्लिम मोठ्या संखेने राहत असल्याने विकासाकड़े दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.