मुंबई शहरातील सर्व मुख्य पर्यटनस्थळांची विशेष स्वच्छता मोहिम संपन्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 October 2016

मुंबई शहरातील सर्व मुख्य पर्यटनस्थळांची विशेष स्वच्छता मोहिम संपन्न

मुंबई / प्रतिनिधी - 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत विविध क्षेत्रे समाविष्ट करण्यासाठी दिनांक १ एप्रिल, २०१६ पासून दिनांक ३१ मार्च, २०१७ पर्यंत १५-१५ दिवसांच्या विविध विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश 'शहरी विकास मंत्रालय' यांचेकडून प्राप्त झाले असून दिनांक २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा करण्यात आला असून या दिनानिमित्त दिनांक १६ ते ३० सप्टेंबर २०१६ या पंधरवडय़ामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियाना अंतर्गत मुख्य पर्यटनस्थळांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये आरे कॉलनी - गोरेगाव, पिकनिक स्पॉट - गोरेगाव (पूर्व), दादर बस डेपो (पूर्व), नायडू कॉलनी - पंतनगर, घाटकोपर (पूर्व), आर.बी. कदम मार्ग - बर्वेनगर, चिराग नगर, शाम नगर - अंधेरी, पोलिस उपआयुक्त सशस्त्र पोलिस दल कार्यालय - ताडदेव या पर्यटनस्थळी स्वचछता अभियान राबविण्यात आले. तसेच गोरेगाव रेल्वे स्थानक व स्वामी नारायण मंदिर, दादर स्टेशन (पूर्व) येथे श्रमदान करुन रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्यात येऊन पंधरवडा साजरा करण्यात आला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad