मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘शरद पौर्णिमा’ (कोजागरी पौर्णिमा) कालावधीत पवई उद्यान आणि तलाव परिसरात अभ्यागतांना तसेच नागरिकांना थांबण्यास तसेच उद्यानात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.
‘शरद पौर्णिमा’ निमित्त शुक्रवार, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१६; शनिवार, दिनांक १५ ऑक्टोबर, २०१६ आणि रविवार, दिनांक १६ ऑक्टोबर, २०१६ या तीन दिवशी पवई उद्यान आणि तलाव क्षेत्रात अभ्यागतांना तसेच नागरिकांना सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. सायंकाळी ५.०० ते सकाळी ७.०० या कालावधीत मात्र कोणालाही या तीन दिवशी तलाव आणि उद्यान परिसरात थांबू दिले जाणार नाही, तसेच प्रवेशही दिला जाणार नाही. याबाबतीत नागरिक आणि अभ्यागत यांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

No comments:
Post a Comment