प्रभागरचना व आरक्षणामुळे महापौर, विरोधी पक्षनेते, गटनेत्यांना धक्का - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रभागरचना व आरक्षणामुळे महापौर, विरोधी पक्षनेते, गटनेत्यांना धक्का

Share This
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी आरक्षणाची सोडत संपन्न
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमधे 80 टक्के नगरसेवकांचे प्रभाग पुनर्ररचित झाल्याने तसेच अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने महापौर, विरोधी पक्ष नेते, गटनेते तसेच अनेक नगरसेवकाना आपल्या प्रभागावर पाणी सोडावे लागले आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, महिला आरक्षणाची सोडत आज सोमवारी (3 ऑक्टोबर) बांद्रा येथील रंग शारदा थिएटर येथे संपन्न झाली. अनुसूचित जातीसाठी 15, जमातीसाठी 2, इतर मागासवर्गासाठी 61 तर महिलांसाठी राखीव असलेल्या 74 अश्या एकूण 152 प्रभागांची सोडत यावेळी काढण्यात आली. या सोडतीमुळे आपले प्रभाग आरक्षित झाल्याने अनेक नगरसेवकांचे प्रभाग राखीव झाल्याने त्यांना बाजूच्या प्रभागामधून निवडणूक लढवावी लागणार आहे. तर अनेक नगरसेवकांचे प्रभाग व बाजूचे प्रभाग राखीव झाल्याने अश्या नगरसेवकांना मात्र पुढील निवडणूकीची वाट बघत बसावी लागणार आहे. तर बहुसंख्य नगरसेवकांनी आपले प्रभाग पुनरर्चित झाल्याने, आरक्षित झाल्याने बाजूचे प्रभागांची शोधाशोध सुरु केली आहे.

प्रभाग रचनेमधे मधे बदल, मागासवर्ग व महिला  आरक्षण यामुले महापौर स्नेहल आंबेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण छेड़ा, माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, सुधीर जाधव अश्या अनेक नगरसेवकाना फटका बसला आहे. कोंग्रेसचे विरोधी पक्ष नेते प्रवीण छेड़ा व माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांचे प्रभाग पुनर्ररचित झाल्याने बाजुच्या प्रभागामधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर महापौर स्नेहल आंबेकर यांनी माझा प्रभाग फेररचनेत विभागला गेल्याने बाजुला अनुसूचित जातीच्या प्रभागामधून निवडणूक लढ़वण्यास पक्षाने सांगितल्यास आपण निवडणूक लढ़वू असे महापौर आंबेरकर यांनी सांगीतले आहे.

सूचना व हरकतीबाबत 
आरक्षित प्रभाग किंवा प्रभागांची फेररचना याबाबत ५ ते २० ऑक्टोबर दरम्यान हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. ५ नोव्हेंबरला सुचना व हरकतीवर सुनवाई घेवुन १८ नोव्हेंबरला त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. २२ नोव्हेंबरला प्रभाग रचना, अधिसुचना व नकाशामधे योग्य ते बदल करून अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. 

महापालिका निवडणूक 2017 साठी प्रभागांचे आरक्षण
अनुसूचित जातीसाठी राखीव 15 प्रभाग 
26,53,93,121,142,146,152,155,169,173,195,198,200,210,225
महिला (8) - 26,53,93,121,142,200,210,225
पुरुष (7) - 146,152,155,169,173,195,198,

अनुसूचित जमातीसाठी राखीव 2 प्रभाग
महिला (1)
- 59
पुरुष (1) - 99

इतर मागासवर्ग (ओबीसी)साठी राखीव 61 प्रभाग
महिला (31) 
-119,22,21,52,126,180,122,183,158,181,65,157,224,147,218,140,67,32,100,46,27,190,143,90,137,217,171,117,42
पुरुष (30) -  48,6,153,211,76,193,81,9,163,31,28,175,91,104,72,161,40,129,10,55,162,206,33,38,45,89,216,

सर्वसाधारण महिलांसाठी राखीव 74 प्रभाग -  223,215,203,199,192,191,187,144,135,134,128,124,113,110,109,102,94,92,75,70,64,63,44,36,30,19,49,148,39,174,125,116,189,212,207,202,167,138,136,120,112,111,107,105,66,61,54,47,35,34,25,14,7,4,1,156,188,123,74,86,57,56,219,168,24,69,16,130,83,177,201,37

खुला प्रवर्गसाठी 75 जागा -
220,159,213,182,85,176,82,68,11,13,23,132,54,214,108,160,43,127,127,118,77,80,178,97,184,58,141,208,60,106,149,15,133,194,50,179,18,209,88,2,150,29,79,20,227,204,221,172,3,12,87,139,197,170,71,131,41,166,84,96,73,205,185,165,114,145,103,151,98,115,164,101,95,8

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages