डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था

Share This
औरंगाबाद - गोपीनाथराव मुंडे यांचे ग्रामविकासातील योगदान लक्षात घेऊन या क्षेत्रातील नाविण्यपूर्ण कामासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करण्याच्या प्रस्तावास आज औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली.
ही संस्था ग्रामीण जीवनामध्ये गुणवत्तापूर्ण वाढ करण्यासह यासाठी आवश्यक माहिती तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करुन नाविन्यपूर्ण आणि जागतिक प्रायोगिक केंद्र म्हणून कार्य करेल. या संसथेमार्फत औपचारिक तसेच अनौपचारिक ग्रामीण विकासाचे शिक्षण तसेच प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय शासकीय योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचे मुल्यमापन करणेही या संस्थेकडून अपेक्षित आहे.

उद्योग आणि व्यावसायांच्या उभारणीसाठी शासकीय व गैरशासकीय संस्थाच्या मदतीचे आर्थिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे कार्य ही संस्था करेल. याशिवाय ही संस्था शेतकरी मालास प्रोत्साहन देणे, शेतकरी मालावर प्रक्रिया करणे, तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे कार्य करेल. या संस्थेकरिता आवश्यक निधीची पूर्तता करणे तसेच वित्तीय व इतर अनुषंगिक बाबी तपासण्याच्या दृष्टीने प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages