जात पडताळणीची कार्यवाही आता जलद होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जात पडताळणीची कार्यवाही आता जलद होणार

Share This
पोलीस उपअधीक्षकांची 21 नवी पदे
औरंगाबाद - राज्यातील जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या दक्षता पथकासाठी पोलीस उपअधीक्षकांची 15 पदे पुनरुज्जीवित करण्यासह नवीन 21 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्य शासनाने मार्च 2015 मध्ये प्रत्येक जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी पंधरा विभागीय जात पडताळणी समित्या कार्यरत होत्या. त्यावर पोलीस उपअधीक्षक संवर्गाची पंधरा पदे मंजूर होती. या विभागीय समित्यांऐवजी 36जिल्हास्तरीय समित्या स्थापन झाल्याने पूर्वीच्या समित्यांवरील पोलीस उपअधीक्षकांची 15 पदे पुनरुज्जिवित करण्यासह जास्तीची 21 पदे निर्माण करण्याची गरज होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठीच्या 2.62 कोटी वार्षिक भारासही मान्यता दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages